निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मडळाची राज्यकार्यकरिणी निवड! रामपुर येथील अनिल लोखंडे यांची राज्य प्रमुख संघटकपदी निवड


निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मडळाची राज्यकार्यकरिणी निवड! रामपुर येथील अनिल लोखंडे यांची राज्य प्रमुख संघटकपदी निवड

राहुरी प्रतिनिधी-विजय एस भोसले 

राहुरी तालुक्यातील रामपुर येथील प्रगत शिल शेतकरी कुटुंबातील बालवयातच सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन गावपातळीवर निसर्गाचा अभ्यास करून धडे देणारे आज त्याच्या कामाची पावती म्हणुन त्यांनी आपले पर्यावरण संरक्षण संवर्धन व तत्संबधी केलेली जनजागृती व वृक्षारोपण संवर्धन या कार्याची राज्यपातळीवर दखल घ्यावी लागली. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मडळ महाराष्ट्र या संस्थेच्या बैठकीत प्रमुख संघटक पदी प्रा. अनिल किसान लोखंडे यांची सन २०२०/२५ या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली.अशा या ग्रामीण भागातील प्रगतशील शेतकरी कुटुंबातील श्री अनिल लोखंडे सर यांनी आपले बुध्दीकौशल्य वापरुन राष्ट्रहित व समाज हित जोपासत पर्यावरण पुरक  कार्य करावे असे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मडळाचे अध्यक्ष वृक्ष मित्र व वनश्री पुरस्कार प्राप्त श्री आबासाहेब मोरे सर,उपाध्यक्ष विलास महाडिक सर,कार्याध्यक्ष माजी प्रा. जी.डी. शिंदे सर,सचिव प्रमोद मोरे सर यांचे प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन केले. 

 प्रा.अनिल लोखंडे सर यांच्या निवडीबद्दल लोकनेते पदम भूषण बाळासाहेब विखे पा प्रवरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष - मा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ,दक्षिण लोकसभा खासदार डॉ सुजय दादा विखे पा , संस्था संचालक आहेर सर , आजी व माजी मुख्याध्यापक , श्री रावसाहेब साबळे पाटील - अध्यक्ष संत महिपती महाराज ट्रस्ट , मा सरपंच राहुल पा साबळे ,सरपंच सौ -मनीषा भोसले , भाऊसाहेब साबळे ,ज्ञानदेव पा लोखंडे , व इतर मित्र परिवारानी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News