प्रसाद बोगावत ने जिंकला मिस्टर हँडसम किताब


प्रसाद बोगावत ने जिंकला मिस्टर हँडसम किताब

भिगवण (प्रतिनिधी) नानासाहेब मारकड 

         दिल्ली येथील ग्लीट्ज वेस्टेंड इन हॉटेल मध्ये आयोजित आशियाई प्रसिद्ध मिस्टर अँड मिस इंडिया एशीया इंटरनॅश्नल 2019-2020 स्पर्धेमध्ये भिगवण जि. पुणे येथील प्रसाद बोगावत याने मिस्टर हँडसम हा मानाचा पुरस्कार जिंकला आहे.

जीआयई प्रोडक्शन च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये मोठया संखेने युवकांनी भाग घेऊन विविध स्पर्धा फेऱ्यामध्ये सहभाग नोंदविला होता. 

प्रसाद बोगावत हा भिगवण जि. पुणे येथील प्रसिद्ध किराणा व्यापारी श्री चेनसुखलाल बोगावत यांचा नातू व कै. प्रदिप (मुन्नाशेठ) बोगावत यांचा मुलगा असून सध्या तो पुणे येथील सिंबॉयसीस कॉलेज मध्ये एम.बी.ए.  करीत आहे. प्रसाद च्या यशामुळे भिगवण गावात आनंदाचे वातावरण असून ग्रामीण भागातील एक युवक या कार्यक्रमात भाग घेऊन एवढे मोठे यश संपादित करू शकतो हे प्रसाद ने दाखवून दिले आहे,

जैन समाजातील सर्व मान्यवरांनी प्रसाद चे खुप कौतुक केले व तसेच त्याचे पुणे येथे जाऊन अभिनंदन केले

  श्री सचिन बोगावत,संदीप बोगावत,प्रदीप बोरा,मनोज मुनोत,महावीर कोठारी,ओमप्रकाश बोरा,राहुल गुंदेचा,कमलेश गांधी,चेतन बोरा,सार्थक गांधी इत्यादि मान्यवरानी प्रसाद चे पुणे येथे जाऊन अभिनंदन केले व त्याच्या पुढील वाटचालीस गावकऱ्यांनी आणि त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हर्दीक शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News